जेवणाचा डब्बा घेऊन मुलगा शेतात गेला, वडील कांद्याच्या पिकात विचित्र अवस्थेत पडलेले, धक्कादायक माहिती आली समोर….

अहिल्यानगर : येथील जेऊरमधील लिगाडे वस्ती येथे एक हृदयद्रावक घटना घडली. कांदा पिकाला पाणी देत असताना विजेच्या केबलला स्पर्श झाल्यानं शॉक लागून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. यामुळे एकच खळबळ उडाली. कोणाच्या मनातही नसताना ही घटना घडल्याने एकच गोंधळ उडाला. भीमराज परबत तोडमल असे त्यांचे नाव होते.
एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. भीमराज तोडमल हे सकाळी कांद्याला पाणी देण्यासाठी गेले होते. पिकाला पाणी देत असताना विजेच्या तारेला हात लागल्याने त्यांना जोराचा विजेचा धक्का बसला. यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दुपारच्या सुमारास मुलगा रविराज जेवण घेऊन शेतात पोहोचला. तेव्हा वडील बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसले. तातडीने रुग्णवाहिका बोलावून त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्याआधीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यामुळे कुटूंबियांना मोठा धक्का बसला.
दरम्यान, घुरुडी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या शेतात भीमराज तोडमल हे गुरुवारी सकाळी कांद्याला पाणी देण्यासाठी गेले होते. ते वनविभागात अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झाले होते. या घटनेने सध्या हळहळ व्यक्त केली जात आहे. अचानक घडलेल्या या घटनेने कुटूंबाने एकच आक्रोश केला.