गृहराज्यमंत्री योगेश कदम अडचणीत, गुंड घायवळच्या भावाशी कनेक्शन, अधिकारांचा गैरवापर? धक्कादायक माहिती समोर..


पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ सध्या लंडनला फरार असून एकीकडे त्याच्या पासपोर्टवरून वादगं उठल असतानाच आता त्याच्या भावाला बंदूक परवाना दिल्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सहीने त्यांच्या भावाला शस्त्र परवाना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता योगेश कदम यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला बंदुकीचा परवाना मिळाल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणांमध्ये बोलताना गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, शस्त्र परवाना देत असताना कुठलाही गुन्हा त्याच्यावर दाखल नव्हता सचिन घायवळ याच्यावर फक्त खुणाचा गुन्हा नाही तर मोक्का अंतर्गत सुद्धा गुन्हे दाखल होते. विशेष अशा व्यक्तीला शस्त्र परवाना दिला जाऊ नये असा पोलिसांचा अहवाल होता.

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सचिन घायवळला शस्त्र परवाना दिल्याची माहिती समोर आल्यानंतर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सचिन घायवळला शस्त्र परवाना दिल्यावरून तात्काळ राजीनामा देण्याची मागणी केली आहे.

सुषमा अंधारेंच्या ट्वीटमध्ये काय?

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करत एका गुंडाला अभय देण्याचा आणि त्याला बळ पुरवण्याचा प्रयत्न केला आहे. योगेश कदम तुम्हाला पदावर राहण्याचा अधिकार नाही तात्काळ गृहराज्यमंत्री पदाचा राजीनामा द्या.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!