पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्ग , न्हावरा – केडगाव चौफुला रस्त्याच्या विविध प्रश्नासंदर्भात आ.राहुल कुल यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भेट


उरुळी कांचन : पुणे -सोलापूर महामार्गावरील नित्याची झालेली वाहतूक कोंडी, नागिरकांना होणारा त्रास,भविष्यातील गरज तसेच रस्ता रुंदीकरणासाठी उपलब्ध जागेची अडचण लक्षात घेता हडपसर ते कासुर्डी टोल नाक्यापर्यंत दुमजली उड्डाणपूल होणे गरजेचे आहे त्याचबरोबर पुणे -सोलापूर महामार्गावरील दाट लोकवस्ती असलेल्या भागांतील रोड जंक्शन वर उड्डाणपूल बांधण्यात यावेत, या महामार्गावरील दौंड तालुका हद्दीतील अतिरिक्त सर्व्हिस रोड आणि स्लिप रोडचे काम पूर्ण करावे तसेच वरवंड ता. दौंड (KM 58/200) येथे अतिरिक्त नवीन अंडरपास उभारण्यात यावा अशा भरगच्च मागण्यांसाठी आमदार राहुल कुल यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे.
न्हावरा – केडगाव चौफुला रस्ता हा रस्ता पुणे – मुंबई, पुणे – नाशिक, पुणे- अहमदनगर, पुणे-सोलापूर आणि पुणे- सातारा आदी राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा असून या मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून गंभीर अपघातांचे प्रमाण देखील वाढत आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे या रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग( NH- 548 DG ) घोषित करण्यात आले असून सदर रस्त्याचे रुंदीकरण आणि विस्तारीकरण तातडीने हाती घेण्यात यावे अशी प्रमुख मागणी राहुल कुल यांनी नव्याने केली आहे.

हडपसर ते कासुर्डी उड्डाणपूल करा
पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गवरील हडपसर ते कासुर्डी टोल नाक्यापर्यंत दुमजली उड्डाणपूल उभारण्याबाबत म नितीन गडकरी यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. तसेच (NH- 548 DG) न्हावरा – केडगाव चौफुला रस्ताचे काम तातडीने सुरु करण्याचे तसेच निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत