प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलला पुणे पोलिसांनी धाडली नोटीस ; काय आहे प्रकरण?

पुणे : प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या कारला पुणे -मुंबई- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ अपघात झाला होता.गौतमीच्या कारने रस्त्यावर असलेल्या एका रिक्षाला जोरदार धडक दिली होती. या अपघात प्रकरणी आता तिच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी हजर राहण्याचे आदेश गौतमीला बजावण्यात आले आहेत.पुणे पोलिसांनी तिला नोटीस बजावली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मंगळवारी, पहाटे 5 वाजता पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात एका भरधाव वाहनाने एका रिक्षाला धडक दिली. हे वाहन गौतमी पाटील हिच्या नावावर असल्याचा समोर आलं. या अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सामाजी विठ्ठल मरगळे असे त्याचे नाव आहे. अपघातानंतर कारचालक फरार झाला होता. मात्र सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी 30 वर्षीय वाहन चालकाला अटक केली आहे. आता या अपघात प्रकरणी चौकशी करण्यासाठी पोलिसांनी गौतमी पाटील हिला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, ज्या वाहनाने रिक्षाला धडक दिली ते वाहन गौतमी पाटीलच्या नावावर असल्यामुळे सिंहगड रोड पोलिसांनी तिला नोटीस पाठवली आहे. या अपघात प्रकरणी चौकशीसाठी हजर रहावे असे या नोटीसमध्ये बजावण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
