फुकट जेवण न दिल्याने झोमॅटो डिलिव्हरी बॉयला मारहाण करून लुटले; कदमवाकवस्तीतील फुकट्यांना चोवीस तासांत जेरबंद….


लोणी काळभोर : झोमॅटो डिलिव्हरी बॉयला जेवणाची ऑर्डर दिले नंतर ती कॅन्सल करण्यात आली. त्यानंतर फुकट जेवण न दिल्याने त्याला लाथाबुक्क्यांनी व दांडक्यांनी मारहाण करून लुटल्या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी स्वप्निल ईश्वर काळे (वय ३७, रा. श्री स्वामी समर्थ रेसिडेन्सी मांजरी गोपाळपट्टी हडपसर पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून स्वप्रिन भागवत बंगने (वय २४, रा. भगवा चौक, सिद्राम मळा, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे), रोहन अजिनाथ लोंढे (वय २६, रा. पाषाणकर बाग, लोणीकाळभोर, ता. हवेली, जि. पुणे) व अजित शहाजी चांदणे (वय २१, रा. गायकवाड वस्ती, धनलक्ष्मी पार्क, कदमवाकवस्ती ता.हवेली) यांना अटक करण्यात आली आहे.

सदर घटना हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील झुडीओ शॉपच्या समोर असलेल्या सेवा रस्त्यावर बुधवारी (१ ऑक्टोबर) रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्निल काळे हे गेल्या दोन वर्षापासुन मगरपट्टा झोन, हडपसर पुणे येथे झोमॅटो या कंपनीमध्ये डिलीव्हरी बॉय म्हणून कार्यरत आहेत. पुणे शहरात फातीमानगर, वडकी, लोणी काळभोर, मगरपट्टा, हडपसर इत्यादी परिसरात झोमॅटोची डिलीव्हरी देण्याचे काम करतात. बुधवारी ते लोणी काळभोर येथे जेवणाच्या पार्सलची ऑर्डर देण्यासाठी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास झुडीओ शॉपच्या समोर पोचले. तेव्हा वरील तिघांनी दमदाटी करून ऑर्डर कॅन्सल करण्यास सांगीतली.

काळे यांनी ऑर्डर कॅन्सल केल्यानंतर, परत ती ऑर्डर आम्हालाच पाहीजे असे म्हणून त्यांनी काळे यांना लाथाबुक्क्यांनी व दांडक्यांनी मारहाण करुन जखमी केले. तसेच झोमॅटो कंपनीचे ४४७ रुपये किंमतीचे खाण्याचे पार्सल व विव्हो कंपनीचा मोबाईल असा एकूण २० हजार ४४७ रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावून चोरून पळून गेले.

याप्रकरणी स्वप्निल काळे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल होताच, लोणी काळभोर पोलिसांनी आरोपींना अवघ्या २४ तासाच्या आत अटक केली आहे. तिघांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी २० हजार रुपये किंमतीचा मोबाईल हस्तगत केला आहे.

वरील उल्लेखनीय कामगिरी पुणे शहर पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस उपनिरीक्षक उदय काळभोर, रत्नदीप बिराजदार, पोलीस हवालदार गणेश सातपुते, अण्णा माने, रामहरी वणवे, पोलीस अंमलदार राहुल कर्डिले, प्रवीण धडस, योगेश पाटील, शैलेश कुदळे, सुरज कुंभार, चक्रधर शिरगिरे, सचिन सोनवणे, बाजीराव वीर व त्यांच्या पथकाने केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!