भटक्या कुत्र्यांने हल्ला चढविल्याने अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी…!


मुंबई : कल्याण शहरातील मुरबाड रस्त्यावरील ब्राह्मण सोसायटीच्या परिसरात भटक्या कुत्र्याने एका अल्पवयीन मुलावर हल्ला करून त्या मुलाला गंभीर जखमी केले आहे. या अल्पवयीन मुलावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.

 

 

 

 

मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत त्यामुळे मुलं सोसायटीच्या परिसरात खेळतात. त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासामुळे त्यांच्यावर योग्य कारवाई व्हावी यासाठी तेथील स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

बहुतेक मुलांचे पालक नोकरी निमित्ताने घराच्या बाहेरच असतात. अशातच जर त्या लहानग्या मुलांना श्वान चावला तर त्या आई-वडिलांना नोकऱ्या सोडून घरीच थांबावं लागलं. या सगळ्या प्रकरणातून तेथील नागरिकांकडून पालिका अधिकाऱ्यांना श्वानांबाबत योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!