अनेकांचे अर्ज बाद! एकाच मृत्यू, पुणे जिल्ह्यातील बाजार समितीच्या निवडणुकीत रंगत वाढली…!


पुणे : जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांसह पुणे (हवेली) कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी छाननी झाल्यानंतर अनेक उमेदवारी अर्ज वैध झाल्याने आता सर्वच बाजार समित्यांमध्ये चुरस वाढली आहे. अर्ज माघारीच्या २० एप्रिलच्या शेवटच्या दिवसापर्यंत सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे टेंशन वाढणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

 

 

 

जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेल्या जुन्नर बाजार समितीच्या माजी सभापती रघुनाथ लेंडे यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. तर एका उमेदवाराचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे जुन्नरमध्ये काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

 

 

 

 

 

आता अर्ज माघारीनंतर चिन्ह वाटप झाल्यावर सर्व लढती स्पष्ट होऊन, खऱ्या अर्थाने रणधुमाळी सुरू होणार आहे. हवेली बाजार समितीच्या निवडणुकीत १८ जागांसाठी तब्बल ३०१ उमेदवारांनी अर्ज दाखल झाले होते.

 

छाननीमध्ये १६ उमेदवारांचे १८ अर्ज बाद करण्यात आले, तर ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त अर्ज भरले होते त्यांचा एकच अर्ज मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे ३०१ अर्जांपैकी १९५ अर्ज वैध ठरले आहेत.

दरम्यान, जुन्नरमध्ये बेल्हे गावातील किशोर तांबे यांनी सोसायटी गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र दोन दिवसांपासून ते बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबीयांनी केली होती. त्यांचा मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!