मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर होणार? भाजपच्या आमदाराच्या दाव्याने खळबळ.

पुणे : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्व राजकीय पक्षासह इच्छुकांना गेल्या पाच वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहे. अशातच आता या निवडणुका संदर्भात महायुतीतील भाजपच्या आमदाराने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर होतील असा दावा भाजपचे आमदार राहुल आवाडे यांनी केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, निवडणुकीत मतदान ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर होणार आहे. या संदर्भात जाहीर होणाऱ्या कच्च्या मतदार यादीमध्ये आपले नाव नीट तपासा. निवडणुकीनंतर मत चोरी झाल्याचा आरोप करू नका असा टोला देखील त्यांनी लगावला. मतदान बॅलेट पेपरवर होणार असल्यामुळे मशीन मॅनेज केल्याचा आरोप होणार नाही असे देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान ओबीसी आरक्षणाच्या मुद्यासह इतर कारणामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या.. मात्र आता कोर्टाने निवडणूक घेण्याचे अंतिम आदेश दिले आहेत. त्यामुळे आता पुढील 4 महिन्यांमध्ये या निवडणुका पार पडणार आहेत. त्याचबरोबर महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद,जिल्हा परिषद अशा निवडणुका एकाच वेळी घेणे निवडणूक आयोगाला शक्य नसल्याने या निवडणुका टप्प्याटप्प्याने घ्याव्या लागणार असल्याचंही म्हटलं जात आहे.
