अंजली दमानियांनी बॉम्ब फोडला ; नितीन गडकरींवर भ्रष्टाचाराचा आरोप, मुलांच्या कंपन्याचा घेतला लाभ, राजकीय वर्तुळात खळबळ..


पुणे : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांनंतर आता महाराष्ट्राच्या तसेच देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. गडकरी यांनी जनतेवर टोल थोपवाल्याचा आरोप केला आहे. नागरिक आधीचं रोड टॅक्स सेल्स, सेल टॅक्स,जीएसटी असे सर्व कर भरत असताना टोल का लादला जात आहे अशी विचारणा अंजली दमानिया यांनी केली आहे.

दमानिया पुढे म्हणाल्या, नितीन गडकरी यांनी लोकांची पूर्णपणे आर्थिक फसवणूक केली आहे. गडकरी यांनी लोकांच्या डोक्यावर रस्ते, टोल थोपवले. रस्ते आणि टोल यांच्या माध्यमातून मिळालेला पैसा हा आयडीएल नावाच्या कंपनीत आला. आयडीएल कंपनीतून हा पैसा नितीन गडकरी यांच्या दोन्ही मुलांच्या कंपनीत पाठवला गेला, असा खळबळजनक आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. तसेच आपल्या पदांचा उपयोग मुलांच्या कंपन्यांना फायदा मिळवून देण्यासाठी केला असल्याचंही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान नितीन गडकरी मंत्री म्हणून देशसेवा करण्यासाठी आले होते.स्वतःच्या मुलांसाठी कंपन्या उघडण्यासाठी नाही, त्यांनी आपल्या पदाचा उपयोग मुलांच्या कंपन्यांना फायदा मिळवून दिला. त्यांनी प्रत्येक कॉन्ट्रॅक्टमध्ये त्यांच्या कंपन्या कशा येतात यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.टोलच्या माध्यमातून ते पैसे खात आहेत, असा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!