राज्यात गावोगावी राष्ट्रवादी ज्येष्ठ नागरीक संघटना स्थापन करणार ; ज्येष्ठ नागरीक प्रदेशाध्यक्ष सोनबा चौधरी यांची माहिती….!

पुणे : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसने सध्या आगामी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. यामुळे अनेक उपक्रम देखील सुरू केले आहेत. आता महाराष्ट्र राज्यामध्ये गावोगावी राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ नागरिक संघटना स्थापन करणार आहे.

याबाबत प्रदेशाध्यक्ष सोनबा चौधरी यांनी माहिती दिली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे व 358 तालुक्यांमध्ये प्रत्येक गावागावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नागरिक संघटनेची स्थापना करणार असे त्यांनी सांगितले आहे .
महाराष्ट्रामध्ये 33 जिल्ह्यांचे अध्यक्ष व 105 तालुकाध्यक्ष यांची यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक संघटना मजबूत करण्यासाठी भरपूर वेळ देण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे. राज्यांमध्ये ते प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून गेल्या पाच महिन्यांमध्ये त्यांनी 32 जिल्ह्यांचा दौरा केला.

कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाडा या ठिकाणी विभाग प्रमुखांची नियुक्ती केली आहे. आता त्यांनी हवेली तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये संघटना स्थापन करणार असल्याचे सांगितले आहे.

तसेच त्यानंतर पुणे जिल्हा पूर्ण घेऊन राज्यामध्ये प्रत्येक तालुकाध्यक्ष मार्फत गावोगावी संघटना स्थापन करण्याचे ठरवले आहे. याचा पक्षाला नक्कीच फायदा होणार आहे.