मोठी बातमी! पुणे विमानतळावर विधानसभा लढलेल्या माजी जिल्हा परिषद सदस्याच्या बॅगेत रिव्हॉल्वर, पुण्यात खळबळ…

पुणे : गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यात विमानतळावर भाजप पदाधिकाऱ्याकडे रिव्हॉल्वर सापडली असल्याची घटना ताजी असताना आता अजून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे विमानतळावर विधानसभा लढलेल्या माजी जिल्हा परिषद सदस्याच्या बॅगेत रिव्हॉल्वर सापडली आहे. यामुळे पुण्यात खळबळ. उडाली आहे. याबाबत तपास सुरू आहे.

याबाबत माहिती अशी की, चंद्रकांत प्रभाकर बागल हे पुणे ते वाराणसी या विमानाने प्रवास करणार होते. विमान प्रवासापूर्वी सुरक्षेअंतर्गत त्यांची बॅग स्कॅनरमधून तपासण्यात आली. यामध्ये सीआयएसएफ आणि विमानतळ प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना रिव्हॉल्वर व पाच जिवंत काडतुसे आढळून आली. यामुळे मोठी खळबळ उडाली.
याबाबत त्यांची संपूर्ण चौकशी करण्यात येत आहे. यामुळे पुणे विमानतळावर सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला आहे. याबाबत सुरक्षा रक्षकाने तत्काळ ती जप्त करण्यात आली. बागल हे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर असून त्यांनी २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंढरपूर विधानसभा निवडणूक लढवली होती.

या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. मात्र आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या घटनेनंतर विमानतळ पोलिस ठाण्यात बागल यांच्याविरोधात भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ च्या कलम ३० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशीत त्यांच्या परवान्याची मुदत केवळ महाराष्ट्रापुरतीच असल्याचे समोर आले.
यामुळे आता त्यांच्यावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांना नोटीस बजावून सोडण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र अनेकदा अशा घटना घडत असल्याने पोलीस यंत्रणांनी ठोस पावले उचल्याची गरज असल्याचे सांगितले जात आहे.