पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा ; नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून देशात बचत उत्सव सुरू होणार.. भाषणातून कोणकोणते मुद्दे?


पुणे : नवरात्री पर्वाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून देशात बचत उत्सव सुरू होणार आहेत. उद्याच्या सुर्योदयाबरोबर जीएसटीच्या नव्या सुधारणा लागू होतील. उद्यापासून जीएसटी बचत उत्सव सुरू होत आहे. या उत्सवामुळे तुमची बचत वाढेल. तुम्ही तुमच्या आवडीच्या वस्तू विकत घेऊ शकाल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, जीएसटीमध्ये सुधारणा केल्यामुळे आता अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत. ५ आणि १२ टक्के हे दोनच कर असणार आहेत. यात सामान्यांना लागणाऱ्या ९९ टक्के जीवनाश्यक वस्तू मोडणार आहेत. यामुळे दुकानदारही आनंदीत झाले आहेत. २०१७ साली भारताने जीएसटी लागू करून नवा इतिहास रचलाभारतात अनेक दशकांपासून भारतातील सामान्य माणूस, व्यापारी वेगवेगळ्या करांच्या जाळ्यात अडकले होते. त्या सर्वांची आपण जीएसटी हा एकच कर लावून मुक्तता केली. असेही त्यांनी म्हटले आहे.

तसेच विकसित भारताचा संकल्प पूर्ण करायचा असेल तर भारताला आत्मनिर्भर व्हावे लागेल. याची मोठी जबाबादरी MSME क्षेत्रावर आहे. जे लोकांना हवे आहे, त्याचे उत्पादन देशातच घेतले पाहिजे. जीएसटी कमी केल्यामुळे आणि नियमात शिथिलता आणल्यामुळे आपल्या देशातील छोट्या उद्योगांना मोठा लाभ होणार आहे. विक्री जास्त आणि कर कमी होणार असल्यामुळे छोट्या व्यापारांनाही मोठा फायदा होणार आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. दरम्यान आता नवरात्रीचे पर्व चालू होणार आहे,तुम्हा सर्वांना शुभेच्छा. नवरात्रीच्या पहिल्याच दिवसापासून देश आत्मनिर्भर भारत होण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलत असल्याचं त्यांनी म्हटलं.

मागच्या ११ वर्षांत २५ कोटी लोकांनी गरीबीला हरवले असून ते गरीबीतून बाहेर येत मध्यम वर्गात आले आहेत. त्यांच्या काही महत्त्वकांक्षा आहेत. यामुळे केंद्र सरकारने यावेळी १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर माफ केला. जीएसटीमध्ये सुधारणा करून आम्ही मध्यम वर्गाला दुप्पट लाभ दिला आहे अशी माहिती त्यांनी जनतेला दिली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!