अनंत चतुर्थीनंतर पहिल्याच संकष्टी चतुर्थीला गर्दी रोढावली; थेऊरच्या श्रीचिंतामणी चरणी भक्तांकडून उत्साहात दर्शन…


लोणी काळभोर : आज भाद्रपद महिन्यातील संकष्टी चतुर्थी पितृपंधरवड्यात आल्याने थेऊर येथील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री चिंतामणीच्या दर्शनाला नेहमीपेक्षा भाविकांच्या गर्दीचे प्रमाण कमी होते.

आज पहाटे पुजारी अजय आगलावे यांच्या हस्ते श्रींची महापूजा करण्यात आली. यानंतर चिंचवड देवस्थानच्या वतीने श्री चिंतामणीची पूजा करण्यात आली यावेळी विश्वस्त केशव विद्वांस उपस्थित होते. देवस्थान तर्फे मंदिर प्रांगण आणि मंदिराबाहेर मांडव घालण्यात आले होते, दर्शनबारी व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी देवस्थान तर्फे भाविकांना उपवासाची खिचडी वाटण्यात आली.

सायंकाळी चिंतामणी भजनी मंडळ यांचे साथीने ह.भ. प. मुक्ताराम (महाराज) चौधरी, जालना यांचे सुभाष्य कीर्तन झाले, चंद्रोदयानंतर श्रींचा छबिना काढण्यात आला. त्यांनतर उपस्थित भाविकांना ग्रामस्थांतर्फे महाप्रसाद देण्यात आला.

जास्त गर्दी होण्याची शक्यता असल्याने लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी आवश्यक तेवढा बंदोबस्त तैनात केला होता. तसेच देवस्थान तर्फे जादा सुरक्षा व्यवस्था करण्यात केली होती. ग्रामपंचायती तर्फे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!