लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेच निधन ; कॅन्सरशी झुंज अपयशी,38 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…


मुंबई : लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वयाच्या 38 व्या वर्षी अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला.कर्करोगाशी झुंज अपयशी ठरल्याने आज सकाळी अभिनेत्रीची प्राणज्योत मालवली.

मनोरंजन विश्वातील लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिने ‘या सुखांनो या’ या मालिकेतून तिने टीव्ही विश्वात पदार्पण केलेले. त्यानंतर प्रियाने ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथं मी’, ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’, ‘येऊ कशी कशी मी नांदायला’ अशा अनेक गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. गोड चेहऱ्याच्या या अभिनेत्रीने ‘तू तिथे मी’, ‘तुझेच मी गीत गात आहे’सारख्या मालिकांमध्ये नकारात्मक भूमिकाही साकारली होती. तिची ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतील मोनिका तुफान गाजली, पण ही मालिकाही तिने अर्ध्यात सोडली होती. याशिवाय ‘पवित्रा रिश्ता’, ‘उतरन’, ‘कसम से’, ‘बडे अच्छे लगते है’ अशा हिंदी मालिकांमधूनही ती घराघरात पोहोचली. आपल्या दमदार अभिनयाने प्रियाने मराठी सिनेसृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. त्यांच्या निधनानं कला सृष्टीवर शोककळा पसरली आहे.

गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होती. अभिनेत्री गेल्यावर्षीपासून सोशल मीडियावरही विशेष सक्रिय नव्हती. तिने शेवटची पोस्ट 11 ऑगस्ट 2024 रोजी केली होती. ज्यात तिने पती शंतनूसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत.प्रियाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झाल्यास, प्रिया आणि शंतनू यांनी 2012 मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यांनी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत एकत्र कामही केले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!