अपघातानंतर कारने पतीला नेले फरपटत ; पत्नीने पतीला शोधले दुसऱ्यादिवशी सापडला मृतदेह…!


सुरत : दिल्लीमध्ये एका तरुणीला कारने फरफटत नेल्यामुळे त्या तरुणीचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देश हादरला असताना आता अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे.

सुरत जिल्ह्यातील पलसाना तालुक्यातील तांतिठिया गावाच्या हद्दीत बुधवारी दुचाकीस्वार सागर पाटील (24) आणि त्याची पत्नी अश्विनी यांना एका कारने धडक दिली. या अपघातात अश्विनी रस्त्याच्या कडेला पडली. तर तिचा पती सागर हा त्या कारमध्ये अडकल्याने कारचालकाने त्याला फरफटत सुमारे 12 किमी नेले. इकडे अश्विनीने सागरला शोधण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी सागरचा मृतदेह विकृत अवस्थेत सापडला. घासत गेल्यामुळे सागरची हाडं देखील बाहेर पडली होती.

या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामुळे हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणातील कारचालक आरोपी अद्यापही फरार आहे.

व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या तरुणाने सांगितले की, तो कामराजच्या कोसमडी गावातून सुरतला येत होता. त्याच्या समोरून एक गाडी जात होती. रस्त्यावर स्पीड ब्रेकरसारखे काहीतरी आले. अचानक एक तरुण गाडीखाली अडकल्याचे त्याने पाहिले. त्याने गाडीचा पाठलाग केला, पण गाडी वेगात होती. त्याने एक व्हिडिओ बनवला. दुसऱ्या दिवशी कळले की, एका जणाचा अपघातात मृत्यू झाला आणि कारचालकाने फरफटत नेले. त्यानंतर त्याने पोलिसांशी संपर्क साधला.

सागरची पत्नी अश्विनी पाटील यांनी सांगितले की, “मी माझ्या मावशीच्या घरी गेलो होते. गेल्या बुधवारी माझे पती मला घेण्यासाठी आले. रात्री 10 वाजेच्या सुमारास आम्ही दुचाकीवरून सुरतकडे निघालो. तेव्हा महामार्गावर गेल्यानंतर काही वेळाने आमच्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या कारचालकाने जोरदार धडक दिली. यात मी खाली पडले. तर माझे पती मला मिळाले नाही. दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह 12 किमी अंतरावर मिळून आला.”सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!