धक्कादायक! पुण्यातील रस्त्यावर मानवी हाडांचा सांगाडा ; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण


पुणे : पुण्यातील नगर रस्त्यावरील शास्त्रीनगर चौकात मानवी सांगाडा आढळून आल्यामुळे खळबळ उडाली.रस्त्याच्या मधोमध हा सांगाडा आढळून आल्यामुळे घटनास्थळी मोठी वाहतूक कोंडी देखील झाली होती. या मानवी सांगाड्याचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा मानवी सांगाडा कुठून आला, कुणाचा आहे? याचा पोलिसांनी तपास केला. तपासातून हा मानवी सांगाडा प्लास्टर ऑफ पॅरिसचा असल्याची माहिती समोर आली आहे.

मधोमध रस्त्यावर मानवी हाडांचा सांगाडा आढळल्याबाबत पोलिसांनी सांगितले की, येरवडा पोलिस स्टेशन हद्दीमध्ये गोल्डन आर्क लॉज समोरील नगर रोडवर हा मानवी सांगाडा आढळून आला होता. प्राप्त माहितीवरून आज दुपारी १५.४५ वाजण्याच्या सुमारास प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. घटनास्थळावर छातीच्या आणि कमरेच्या भागाचा सांगाडा आढळून आला.सांगाड्याची व्यवस्थित पाहणी केली असता हा मानवी सांगाडा नसून प्रयोगशाळेत वापरण्याचा आर्टिफिशल सांगाडा आढळून आला.

दरम्यान हा मानवी सांगाडा प्लास्टर ऑफ पॅरिसने तयार केलेला आणि तारेने एकत्र बांधलेला आहे. यामध्ये संशयास्पद असे काही आढळून आले नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे काहीच कारण नाही. हा प्रयोगशाळेतील सांगाडा इथे कसा आला आणि कुणी आणून टाकला असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!