भयंकर स्फोट ; सोलापुरात चाळीस वर्षीय विवाहितेचा एसीच्या स्फोटाने होरपळून मृत्यू…


सोलापूर : सोलापूर शहरातील जुना विडी घरकुल परिसरात गडगी नगरमध्ये एसीचा स्फोट झाल्याने 40 वर्षीय विवाहितेचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार; पल्लवी प्रवीण सग्गम( वय 40 वर्षे, रा गाडगी नगर, सुवर्ण कळस, सोलापूर, )स्वातंत्र्य दिनाची सुट्टी असल्याने पल्लवी प्रवीण सग्गम घरीच होत्या. दुपारी त्या घरातील कामं करत असताना अचानक त्यांच्या घरातील एसीचा स्फोट झाला. स्फोटानंतर काही काही कळायच्या आत शॉर्टसर्किट झाले आणि आग वेगाने घरात तत्काळ पसरली. आगीच्या ज्वाळा इतक्या भयंकर होत्या की, त्यांना घरातून बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही.पल्लवीच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून सोलापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे. एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. घरात तपासणी केली असता, पल्लवी सग्गम यांचा मृतदेह पूर्णपणे होरपळलेल्या अवस्थेत आढळून आला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!