भावा- बहिणीच्या नात्याला काळीमा;; सात वर्षाच्या चिमुकलीवर चुलत भावाकडून अत्याचार..

जालना : जालन्यात भावा- बहिणीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका सात वर्षांच्या चिमुकलीवर तिच्याच सख्ख्या चुलत भावाने अत्याचार केला आहे. घटना घडल्यानंतर पीडित मुलीच्या आईने तिला रुग्णालयात दाखल केले आहे. अत्याचार प्रकरणी जालना शहरातील पोलिसांनी विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जालना शहरामधील नवीन जालना भागात एका सात वर्षांच्या बालिकेवर तिच्या १४ वर्षीय सख्ख्या चुलत भावाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. अत्याचाराच्या घटनेनंतर बालिकेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी सदर घटनेची माहिती पोलिसांना दिली.त्यानंतर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी पीडित मुलीवर तातडीने उपचार सुरु केले . या गंभीर प्रकरणात मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान पीडित मुलीच्या आईने केलेल्या फिर्यादीनंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणातील विधी संघर्ष बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून हा गुन्हा पिंक मोबाईल पथकाकडे सोपवण्यात आला आहे. सदर बाजार पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.