शरद पवारांना मोठा धक्का ; राष्ट्रवादीचे माजी आमदार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार


पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका तोंडावर असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी उद्या सकाळी 11 वाजता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासह शेकडो कार्यकर्तेही काँग्रेसचा हात हातात घेणार आहेत. त्यामुळे परभणीत शरद पवारांची चिंता वाढणार आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा उद्या सकाळी 11 वाजता मुंबईतील टिळक भवन येथील काँग्रेस कार्यालयात पक्ष प्रवेश पार पडणार आहे.काँग्रेसचे नेते सिद्धार्थ हत्तीअंबिरे आणि बाबाजानी दुर्राणी यांनी आज प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता बाबाजानी दुर्राणी हे आपल्या समर्थक व पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये जाणार असल्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांना मोठा धक्का बसणार आहे. काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केल्यानंतर बाबाजानी दुरानी यांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बाबाजानी दुर्राणी कोण आहेत?

बाबाजानी दुर्राणी 2004 मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर आमदार झाले होते. त्यानंतर 2012 आणि 2018 मध्ये शरद पवारांनी त्यांना विधान परिषदेवर आमदार केलं होतं. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बाबाजानी दुर्राणी हे अजित पवारांसोबत गेले होते. मात्र काही काळानंतर ते पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सामील झाले होते. त्यानंतर आता ते शरद पवारांची साथ सोडत काँग्रेसचा हात हातात घेणार आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!