पुणे पोलीस दलात खळबळ! तरुणींचे पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, बाथरूममध्ये घुसून इनरवेअर….


पुणे : पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्याविरोधात धक्कादायक माहिती समोर आली आहे. तीन दलित तरुणींनी केलेल्या आरोपांमुळे संपूर्ण पोलिस यंत्रणेला हादरा बसला आहे. पीडित मुलींचा दावा आहे की, पोलिसांनी त्यांच्या बेडरूममध्ये आणि अगदी बाथरूममध्येही घुसून इनरवेअरची तपासणी केली. या प्रकारामुळे संतप्त नागरिक आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.

छत्रपती संभाजीनगरहून आलेल्या एका महिलेला मदत केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी कोणत्याही वॉरंटशिवाय घरात प्रवेश केला, मारहाण केली आणि जातीवाचक शिवीगाळ करत मानसिक छळ केला, असा आरोप आहे. याबाबत आमदार रोहित पवार देखील आक्रमक झाले आहेत. एका व्हीआयपी केसच्या तपासासाठी आलेल्या तेथील पोलिसांसह कोथरुड पोलिसांनीही पुण्यातील मागासवर्गीय मुलींवर जातीवाचक शेरेबाजी करून त्यांना मारहाण केली.

याबाबत संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची दोन दिवस मागणी करुनही पोलिस त्याची दखल घेत नाहीत, याबाबत काही सामाजिक कार्यकर्त्यांसह संबंधित मुली पुणे पोलिस आयुक्तालयात दिवसभर बसून आहेत, तरीही पोलिस त्यांची दखल घेत नाहीत. या मुलींना भेटून या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. मागासवर्गीय मुलींवर जातीवाचक शेरेबाजी करणाऱ्या आणि त्यांना मारहाण करणाऱ्या कोथरुडसह छत्रपती संभाजीनगर पोलिसांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे.

संबंधित व्हीआयपी केससाठी दबाव कुणी आणला, संबंधित निवृत्त पोलिस अधिकारी कोण आहे? झिरो पोलिस असलेली महिला, या सर्वांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहील, याबाबत सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा साहेब आणि अप्पर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांच्याशी रोहित पवार यांनी चर्चा केली.

सत्तेची मस्ती चढल्याने निर्ढावलेल्या राज्यकर्त्यांच्या दबावात येऊन काम करणाऱ्या सरकारी यंत्रणाही निर्ढावतात. अशा यंत्रणांचा सर्वाधिक फटका हा सर्वसामन्यांना आणि दीन-दुबळ्यांना बसतो. तसाच काहीसा प्रकार तीन युवतींच्या बाबतीत घडला. त्यांना चक्क कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये अत्यंत खालच्या पातळीवर जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली, असेही रोहित पवार म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!