‘ वादाचा बार’ उडालेल्या सावली बारमधील आर्केस्ट्राची मान्यता अखेर रद्द ; गृहराज्यमंत्र्यांना अभय?

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील सावली बारने राज्याच्या राजकारणात वादाचा बार उडवला. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्याच नावावर हा बार आहे. आता या सावली बारमधील ऑर्केस्ट्राची मान्यताच रद्द करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईतील सावली बारमधील ऑर्केस्ट्राची मान्यता रद्द करण्यात आली आहे. ही मान्यता पोलिस देतात.नियमांचा भंग झाल्याने ही मान्यता पोलिसांनी रद्द केल्याचे समोर आले आहे. या बार मध्ये जेवण आणि मद्य सेवा देण्यास दोन महिने बंदी घालण्यात आली आहे. बारवर कारवाई झाल्यावर उत्पादन शुल्क नियमानुसार १५ दिवस ते २ महिने बार पुर्णतः बंदचे आदेश काढले जात आहेत. यानुसार बार ची पुर्ण मान्यता रद्द होणे हा प्रक्रिया अजून पूर्ण झाली नसून बारचा गुमास्ता, अन्न औषध परवाना, मद्य परवाना हे अजुन रद्द झाले नसल्याचे समोर आले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब यांनी सावली बार वरून अनेक गंभीर आरोप केले होते. गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावे मुंबईत सावली बारचा परवाना असल्याचा आणि त्याबरोबर पोलिसांनी अश्लील नृत्य प्रकरणी प्रकरणी कारवाई केल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर राज्याच्या राजकारणात वादाचा भडका उडाला. सावली बरोबर धाड टाकण्यात आली. यावेळी 22 बारबाला, 25 ग्राहक आणि तीन कर्मचारी यांना ताब्यात घेण्यात आले होते. दरम्यान आता या बारच्या ऑर्केस्ट्राचीमान्यता रद्द केल्याने गृहराज्यमंत्र्यांना अभय मिळाल असल्याच्या चर्चांना उधाण आल आहे.
