पुण्यातील वाहतूक मार्गात 1 ऑगस्टला मोठे बदल; अनेक रस्ते असणार बंद


पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त १ ऑगस्टला पुण्यातील वाहतूक मार्गात मोठे बदल करण्यात आले आहेत. शहरातील अनेक रस्ते बंद राहणार आहेत.सकाळी ७ वाजल्यापासून आवश्यकतेनुसार पुण्यातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात येणार आहेत. मात्र, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, पोलिस यांसारख्या अत्यावश्यक सेवा वाहनांना यामध्ये सूट देण्यात आली आहे.

वाहतूक पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांच्या आदेशानुसार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त १ ऑगस्ट रोजी
पोलिसांनी पुणेकरांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

कोणत्या महामार्गावर वाहतूक बंद आणि पर्यायी मार्ग कोणते?

– जेधे चौक ते सारसबाग पर्यंतचा बालाजी विश्वनाथ पथ वाहतुकीसाठी बंद राहील.

– जेधे चौकाकडून सिंहगड रोडकडे जाण्यासाठी सातारा रोड – व्होल्गा चौक – मित्रमंडळ चौक – सावरकर चौक या पर्यायी मार्गाचा वापर करावा.

– सिंहगड रोडवरून स्वारगेटकडे जाणारी वाहतूक दांडेकर पूल – नाथ पै चौक – ना.सी. फडके चौक – पुरम चौक – टिळक रोड – जेधे चौक मार्गे वळवण्यात येईल.

– जेधे चौकातील वाय-जंक्शन (फ्लायओव्हर) वरून सारसबागकडे प्रवेश बंद राहील.

– कात्रजहून येणाऱ्या वाहनांनी लक्ष्मीनारायण (व्होल्गा चौक) येथून डावीकडे वळावे.

– वेगा सेंटर ते सारसबाग ग्रेडसेपरेटर हा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहील.

– वाहनचालकांनी राष्ट्रभूषण चौक ते हिराबाग चौक या पर्यायी मार्गाचा वापर करावा.

– सावरकर चौक ते पुरम चौकदरम्यानची वाहतूक पूर्णतः बंद राहील.

– नाथ पै चौक – सावरकर चौक – दांडेकर पूल – ना.सी. फडके चौक – कल्पना हॉटेल – टिळक रोड – पुरम चौक हा पर्यायी मार्ग खुला राहील.

– दांडेकर पूल ते सावरकर चौककडे जाणारी वाहतूक बंद राहील.

– दांडेकर पूल व सावरकर चौकातील वाहतूक दुपारी ३ ते रात्री १२ वाजेपर्यंत दुहेरी मार्गाने सुरू ठेवण्यात येईल.

– निलायम ब्रिजवरून सावरकर चौकाकडे जाणारी वाहने पर्वती गाव मार्गे वळवली जातील.

अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध सामाजिक संस्था, स्थानिक मंडळे आणि राजकीय पक्षांच्या वतीने सारसबाग येथील त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले आहे. मिरवणुकीदरम्यान कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी वाहनचालकांनी मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!