पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणातील ‘ड्रग पेडलर ‘फरार ; आरोपीच्या मोबाईलमधून धक्कादायक उलगडा…


पुणे : पुण्यातील खराडी येथील ड्रग पार्टी प्रकरणात अटक आरोपींना कोकेन व गांजाचा पुरवठा करणारा ‘ड्रग पेडलर’ अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. पोलिसांनी घटनास्थळावरून तब्बल 41 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये कोकेन,गांजा,दारू -बिअरच्या बॉटल हुका आणि कार हे सर्व पोलिसांनी जप्त केले होते. मात्र आरोपींना या सर्वांचा पुरवठा करणारा ड्रग पेडलर फरार असल्याने पोलिसांच्या तपासाला आणखीनच वेग आला आहे.दरम्यान पोलिसांच्या तपासात या हॉटेलमध्ये एप्रिल व मे महिन्यातही ‘हाउस पार्टी’ झाल्याची माहिती समोर आली असून, आरोपींच्या मोबाइलमध्ये अनेक महिलांशी चॅटिंगसह पार्टीची छायाचित्रे व चित्रफिती सापडल्या आहेत, अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी न्यायालयात दिली.

न्यायालयात दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यावर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बागल यांनी डॉ. प्रांजल खेवलकरसह पाच जणांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे. दोन तरुणींना न्यायालयीन कोठडी सुनावली. आरोपींच्या शुक्रवारी व शनिवारी झालेल्या पार्टीत हुक्का तयार करण्यासाठी राहुल नावाचा व्यक्ती आल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. पार्टीत आणखी कोणाचा सहभाग होता, याबाबत तपास करायचा आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील अमित यादव यांनी केला. तसेच या हॉटेलमध्ये यापूर्वी एप्रिल व मे महिन्यात झालेल्या पार्टीचाही तपास करायचा असून, त्यामध्ये कोण सहभागी होते, याबाबत आरोपींची चौकशी केली जाणार आहे.. त्यामुळे या पोलिसांच्या तपासात आणखीन कोणत्या गोष्टींचा उलगडा होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा जावई डॉ. प्रांजल मनीष खेवलकर याच्यासह निखिल जेठानंद पोपटाणी,समीर फकीरमहंमद सय्यद, सचिन सोनाजी भोंबे,श्रीपाद मोहन यादव , ईशा देवज्योत आणि प्राची गोपाल शर्मा यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रविवारी अटक केली होती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!