पुण्यात भयंकर अपघात ; धावती स्कुटी घसरली अन तरुणीचा डोकं टेम्पोच्या खाली गेलं…


पुणे : पुण्यातील मुळशी तालुक्यातील भुकूम येथे शुक्रवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात स्कूटर घसरून टेम्पोखाली गेल्याने तरुणी तब्बल 300 फूटपर्यंत फरफटत गेली. नशीब बलवत्तर म्हणून या भीषण अपघातात तरुणी हेल्मेट असल्यामुळे वाचली. पोलिसांकडून याचा पुढील तपास करण्यात येत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वृषाली (पूर्ण नाव गुप्त) ही महिला आपल्या स्कूटरवरून प्रवास करत होती. रस्त्यावर स्कूटर घसरल्याने ती खाली पडली आणि त्याचवेळी पुणे ते पिरंगुटकडे जाणाऱ्या भरधाव एका टेम्पोच्या मागील चाकाखाली तिचे हेल्मेट अडकले. या अपघातात ती सुमारे ३०० फूट फरफटत गेली. हेल्मेट असल्यामुळे तिच्या डोक्याला गंभीर दुखापती झाली नाही. हेल्मेट पूर्णपणे चिरडले गेले, तरीही तिला किरकोळ जखमा झाल्या. स्थानिकांनी तातडीने पुढाकार घेत तिला रुग्णालयात दाखल केले. अपघातादरम्यान वृषालीने थंड डोक्याने परिस्थिती हाताळली आणि गाडी हलवू नये, अशी विनंती उपस्थितांना केली. कारण गाडी हालवली असती तर दुखापत जास्त झाली असती. स्थानिकांनी टेम्पो उचलून काळजीपूर्वक तिला बाहेर काढले आणि रूग्णालयात दाखल केले.

या अपघाताप्रकरणी बावधन पोलिसांनी टेम्पोचालक मयूर राजेश खांडरे (भुकूम येथील रहिवासी) याला अटक केली आहे. नितीन जयसिंग गायकवाड यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!