वैष्णवी हगवणे प्रकरणी महत्त्वाची अपडेट ; वैष्णवीची आत्महत्या नव्हे तर हत्याच, समितीचा धक्कादायक अहवाल

पुणे : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण सध्या राज्यभर चर्चेत आहे. सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून वैष्णवी हगवणे या विवाहितेने आत्महत्या केली. या प्रकरणाचा तपासपोलिसांकडून कसून सुरू आहे. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणी आपला पहिला अहवाल महिला व बालकल्याण समितीने सरकारला सुपूर्द केला. या अहवालात वैष्णवी हगवणेची आत्महत्या हा हुंडाबळीच असल्याचे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.
वैष्णवी हगवणेच्या आत्महत्याप्रकरणी तिच्या नवऱ्यासह तिचे सासू-सासरे, नणंद आणि दीर यांना पोलिसांनी अटक केली आहे. हे सर्व आरोपी सध्या तुरुंगात आहेत. याप्रकरणी महिला व बालकल्याण समितीने दिलेल्या अहवालामध्ये सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी केलेल्या छळामुळेच वैष्णवी हगवणेने हिने आत्महत्या केली असल्याचे म्हटलं आहे. तसेच हे प्रकरण दडपण्यासाठी दबाव आणणारे पोलिस अधिकारी म्हणजेच शशांक हगवणेचे मामा जालिंदर सुपेकर यांची चौकशी करण्याची आणि त्यांच्या पत्नीलाही या प्रकरणात सहआरोपी करण्याची शिफारस अहवालामध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे जालिंदर सुपेकर यांच्या अडचणी वाढणार आहेत.
दरम्यान समितीने अहवालात पुणे ग्रामीण पोलिसांबाबत निष्कर्ष काढला आहे. या अहवालात पोलिसांच्या दुर्लक्षतेमुळे वैष्णवीची आत्महत्या घडल्याच समितीने म्हटलं आहे. वैष्णवीची मोठी जाऊ मयुरीने मारहाण, छळ, विनयभंग तसेच मारून टाकण्याची धमकी केल्या होत्या मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने वैष्णवी आत्महत्या झाल्याचं समितीने म्हटलं आहे.
सासरच्या मंडळींनी हुंड्याच्या माध्यमातून हगवणे कुटुंबियाकडून ब्रँडेड कार, चांदीची भांडी, सोने, रोख रक्कम अशा कामाच्या विविध वस्तू आणि पैसे घेतल्याचे पुरावे देखील समितीला चौकशी करताना मिळाले आहेत. दरम्यान हे प्रकरण दडपण्यासाठी दबाव आणणारे जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी करून त्यांचा सहभाग आढळल्यास निलंबित करून त्यांना सहआरोपी करा असेही त्यांनी म्हटले आहे.