ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्वल निकमांना डबल लॉटरी ; राज्यसभेनंतर आता केंद्रीय मंत्रिमंडळातही लागणार वर्णी?


पुणे : देशातील प्रसिद्ध फौजदारी खटल्यामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून आपला ठसा उमटवणारे जेष्ठ वकील उज्वल निकम राज्यसभेवर दाखल झाल्यानंतर आता त्यांच्या मंत्रिपदाबाबत जोरदार चर्चा रंगू लागली आहे. त्यांना मंत्रिमंडळात प्रवेश मिळाल्यास जळगाव जिल्ह्यातील सतेच राजकीय गणित ढवळून निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपकडून त्यांचं पुनर्वसन राज्यसभेत झालं असलं, तरी केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना संधी दिली जाईल,अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगु लागली आहे.सध्या जळगाव जिल्ह्यातून तीन खासदार संसदेत कार्यरत आहेत. त्यात खासदार रक्षा खडसे यांच्याकडे केंद्रीय युवक व क्रीडा राज्यमंत्री पदाची जबाबदारी आहे. परंतु एकाच जिल्ह्यातून दोन मंत्र्यांची निवड ही केंद्र सरकारच्या समीकरणात बसत नाही. त्यामुळे उज्ज्वल निकम यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यास रक्षा खडसे यांच्या सत्तास्थानाला हादरा बसू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

उज्वल निकम हे भारतातील सर्वोच्च आणि सर्वात प्रतिष्ठित विशेष सरकारी वकीलामध्ये गणले जातात. दहशतवाद, संघटित गुन्हेगारी आणि हायप्रोफॉइल गुन्ह्याशी संबंधित अनेक गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये प्रभावी आणि जोरदार वकीली करून त्यांनी देशभरात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

दरम्यान गेल्या लोकसभा निवडणुकीत उज्वल निकम यांना भाजपने उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी त्यांच्याविरुद्ध आक्रमक प्रचार करत निकम यांना तब्बल १६,५१४ मतांनी पराभूत केलं. परंतु राज्यसभेतून त्यांना संधी देत भाजपने निकम यांचं राजकीय पुनर्वसन केलं. त्यांची मंत्रीपदी वर्णी असू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!