राज्याच्या राजकारणात खळबळ! ७२ मंत्री-अधिकारी हनी ट्रॅपच्या जाळ्यात? बड्या नेत्याचा गौप्यस्फोट, सगळंच सांगितलं…


मुंबई : राज्याच्या राजकारणात एका खुलाशामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. राज्यातील अनेक मंत्री, वरिष्ठ सरकारी अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी ‘हनी ट्रॅप’ मध्ये अडकले असल्याचा दावा एका बड्या नेत्याने केला आहे. यामुळे याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

याबाबत मुंबईतील बड्या नेत्याने दावा केला. हा प्रकार नाशिकमधीलच एका हॉटेलमध्ये घडल्याचे बोलले जात आहे. यासारख्या अनेक घटना उघडकीस येत असतानाच ही खळबळजनक माहिती समोर आली आहे. राज्यातील तब्बल ७२ अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी तसेच राज्यातील अनेक बडे राजकीय नेतेही या हनी ट्रॅप च्या जाळ्यात अडकले आहेत.

नाशिक येथील एक महसूल अधिकारी ‘हनी ट्रॅप’ च्या जाळ्यात अडकल्याचे समोर आले होते. परंतु समोर आलेल्या माहितीनुसार हे प्रकरण छोटे नसल्याचे बोलले जात आहे. यामुळे याबाबत आता तपास होणार का? असा प्रश्न आहे. या सनसनाटी खुलाशामुळे राज्याच्या राजकारण आणि प्रशासकीय यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, यामध्ये कोणाची नावे पुढे येणार हे लवकरच समजेल. हनी ट्रॅप’ हे एखादं मोठं षडयंत्र आहे की केवळ वैयक्तिक संबंधांपुरते मर्यादित आहे. याचाही शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे मात्र चर्चा सुरू झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!