गर्भवती गर्लफ्रेंडला रबडीतून गर्भपाताची गोळी दिली, पुण्याच्या इंजिनिअरचा धक्कादायक कृत्य, नंतर घडलं भयंकर..

पुणे : पुण्याच्या हिंजवडी परिसरात एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवण्यात आले. यातून ती तरुणी गर्भवती राहिली. गर्भधारणेनंतर तरुणीच्या नकळत तिच्या बॉयफ्रेंडने तिला रबडीमधून गर्भपाताची गोळी मिसळून दिली आणि जबरदस्तीने तिचा गर्भपात केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पोलिसांनी आरोपीविरोधात कलम 376 (लैंगिक अत्याचार), 313 (महिलेच्या संमतीशिवाय गर्भपात) आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या घटनेमुळे तरुणीला मोठा धक्का बसला असून तिची फसवणुक झाली आहे. आदर्श वाल्मीक मेश्राम असं आरोपीचे नाव असल्याची माहिती आहे. आदर्श मेश्राम विरोधात एका तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सध्या तपास करत आहेत. आरोपीने तरुणीशी दीर्घ काळ शारीरिक संबंध ठेवले.

तिच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला. तसेच, ती गर्भवती राहिल्यानंतर तिला कोणतीही कल्पना न देता, तिची परवानगी न घेता रबडीमध्ये गर्भपाताचं औषधं मिसळून तिला जबरदस्तीने खायला घातलं. यामुळे तिचा गर्भपात झाला. तिच्या त्या मुलाशी लग्न करायचे होते. मात्र त्याने नकार दिल्याने तिने याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
आरोपीचे पीडितेसोबत सात वर्षांपासून संबंध आहेत. ते कॉलेजच्या काळापासून एकमेकांना ओखळत आहेत. आरोपीने पीडितेला विश्वासात घेऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. अनेकदा ते हॉटेलवर सोबत राहायचे. यातूनच तरुणी गर्भवती राहिली. तिने लग्नाची मागणी केल्यानंतर तो नका देऊ लागला. आरोपीचे इतर मुलींशी देखील संबध होते.
तेव्हा पीडितेला समजले की तिची फसवणूक झाली आहे. ती गर्भवती राहिली, परंतु आदर्शने तिच्याशी लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर आदर्शने रबरीमध्ये गर्भपाताच्या गोळ्या मिसळून पीडितेला खायला दिल्या, ज्यामुळे तिचा गर्भपात झाला. उपचारानंतर पीडितेने हिंजवडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, याबाबत तपास सुरु आहे.