पोलीस दलात खळबळ! पुण्यात अंमलदाराने टॉवेलच्या मदतीने घेतला गळफास, धक्कादायक माहिती आली समोर…

पुणे : पुणे पोलीस दलातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. पुणे पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका 28 वर्षीय पोलीस अंमलदाराने स्वारगेट पोलीस लाईनमध्ये आत्महत्या केली. स्वरुप जाधव असं त्यांचे नाव असून 2023 मध्ये पोलीस दलात भरती झाले होते.

त्यांनी राहत्या घरी गळफास घेतला. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस मोबाईलमधील माहिती तपासत आहेत. या घटनेची माहिती मिळताच खडक पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि तपासास सुरूवात केली. याबाबत अद्याप माहिती स्पष्ट झाली नाही. त्यांनी खोलीच्या खिडकीच्या अँगलला टॉवेलने गळफास घेतला.
घरात कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. यामुळे इतर व्यक्तींकडून तपास केला जात आहे. याबाबत त्यांनी आत्महत्या करण्याची कारणे मोबाईलमध्ये लिहून ठेवलेली आहेत का? हे तपासले जात आहे. मात्र, या घटनेमुळे पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी घटनेच्या ठिकाणी पाहणी केली आहे.

दरम्यान, स्वरुप जाधव यांच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती दिली असून, पोलीस पुढील तपास करत आहोत. 2023 मध्येच पुणे पोलीस दलात स्वरुप जाधव दाखल झाला होता. याबाबत आता पोलीसचा तपास केला जात आहे. मोबाईल अनलॉक केला जात आहे.