पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! मेट्रो लाईन संदर्भात दिलासादायक माहिती आली समोर..

पुणे : पुणेकरांसाठी महत्वाची माहिती आली समोर आली आहे. वाहतूक कोंडीच्या समस्येवर आता दिलासा मिळाला आहे. तसेच . मेट्रो लाईन ३ चा १३ किमीचा टप्पा या वर्षी सप्टेंबरपर्यंत सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या टप्प्यामुळे विशेषतः हिंजवडी परिसरातील रोजची वाहतूक कोंडी कमी होणार असून, प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.PMRDA आणि पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक-खाजगी भागीदारी मॉडेल अंतर्गत हा प्रकल्प उभारण्यात येत आहे.
मेट्रो लाईन ३ चे संपूर्ण काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या टप्प्यांत मेगापोलिस सर्कल ते बालेवाडी फाटा पर्यंतची सेवा सुरू होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या टप्प्यावरील १३ स्थानकांचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे. काही ठिकाणी अंतिम टप्प्याचे काम सुरू असून, यावर पीएमआरडीए विशेष लक्ष देत आहे.

दरम्यान, या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यांत मान ते बालेवाडी फाटा दरम्यानची मेट्रो चाचणीसाठी खुली करण्यात येणार आहे. PMRDA च्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की, आम्ही लाईन सुरू करण्याच्या अंतिम टप्प्यात आहोत आणि सप्टेंबरपर्यंत सेवा सुरु होईल.
पुणे मेट्रो लाईन ३ ही २३.३किमी लांबीची असून, यामध्ये एकूण २३ स्थानके प्रस्तावित आहेत. यापैकी १३ स्थानकांचा टप्पा पहिल्या टप्प्यात सुरु केला जाणार आहे. या मार्गावर अलीकडेच मेट्रोची चाचणी यशस्वीपणे पार पडली असून, ती याआधी केवळ डेपोपुरती मर्यादित होती.