फाईव्ह स्टार हॉटेल एक महिला अन् वाल्मिक कराड, जुन्या सहकाऱ्याने धक्कादायक फोटो आणला समोर…


बीड : येथील मस्साजोगचे सरपंच देशमुख हत्या प्रकरणात अटकेत असलेला वाल्मिक कराडचे सध्या अनेक कुटाने समोर येत आहेत. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली असून सध्या तो आणि त्याच्यसाह संतोष देशमुख हत्याप्रकरणात तुरुंगात आहेत.

असे असताना आता वाल्मिक कराडची आणखी एक जुनी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून एका दलित कुटुंबाला शिवीगाळ करण्यात आल्याचे कथित ऑडिओमधून समोर आलं आहे. यामुळे त्याची प्रकरणे दिवसेंदिवस वाढतच आहेत. तसेच मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एका महिलेसोबतचा फोटोही व्हायरल होत आहे.

यामुळे त्याच्या अडचणी वाढल्या आहेत. एकेकाळी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यासोबत काम करणारे राष्ट्रवादीचे नेते कराडचे जुने सहकारी विजयसिंह बांगर यांनी ही ऑडिओ क्लिप समोर आणली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.

त्यांनी कराडवर गंभीर स्वरूपाचे आरोप देखील केले आहेत. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एका महिलेसोबत असलेला फोटो देखील बांगर यांनी माध्यमांसमोर आणला आहे. आता ही महिला कोण आणि तिथे काय करत होती. याबाबत अजून माहिती समोर आली नाही.

दरम्यान, वाल्मिक हा कराड किलर माणूस असून सायकोपेक्षा बेकार आहे. त्याच्याबाबत असलेले पुरावे घेऊन मुख्यमंत्री आणि पोलीस अधीक्षकांकडे जाणार असल्याचं विजयसिंह बांगर यांनी म्हटले. यामुळे कराडच्या अडचणीत अजून वाढ होणार आहे. याबाबत कराड सध्या जेलमध्ये आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!