राज्यपाल कोश्यारी यांची पदमुक्तीची इच्छा; उर्वरित वेळेत चिंतन, मनन करणार…!

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या राज्यपाल पदाचे राजीनामापत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपविला असल्याची माहिती मिळाली असून त्यांनी पदमुक्त होण्याची इच्छा बोलून दाखविली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधानांकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली असून मी राजीनामा देण्यासाठी इच्छूक असल्याचे राज्यपाल म्हणाले आहेत. महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यपालांच्या हकालपट्टीची मागणी होत होती. अखेर राज्यपालांनी स्वत:च पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आपण आपला उर्वरित वेळ अध्ययन, मनन, चिंतन याकामी सार्थकी लावणार असल्याचे राज्यपाल कोश्यारी यांनी नरेंद्र मोदी यांना सांगितल्याची माहिती आहे. परवा पंतप्रधान मुंबई दौ-यावर होते, यावेळी त्यांनी मोदींकडे राजीनामा पत्र दिल्याची माहिती आहे.
राज्यपाल कोश्यारी यांनी त्यांच्या कार्यकाळात महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधाने केली आहेत. त्यामुळे मागच्या महिन्यामध्ये त्यांच्याविरोधात राज्यामध्ये जनआक्रोश निर्माण झाला होता. त्यांनी उचलबांगडी करावी, अशी मागणी अनेकांनी केली. मात्र त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. आता अखेर खुद्द राज्यपालांनीच पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्याने ते पदमुक्त होऊ शकतात, असे सांगितले जात आहे. त्यांनी राजीनामा पत्र पंतप्रधानांकडे दिल्यानेही आश्चर्य व्यक्त होत आहे.
