कुख्यात गुंड शिदेंच्या सेनेत, युवराज माथनकरचा शिवसेनेत प्रवेश, राजकीय चर्चांना उधाण….


नागपूर : येथील एका सराईत गुंडाने शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहे. ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांचे फोटो व्हायरल झाले आहे. सध्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते व कार्यकर्ते आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत.

असे असताना एकनाथ शिंदेंचा पक्ष बळकट होताना दिसत आहे. अनेक नेते शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. आता सराईत गुंड युवराज माथनकरने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे. युवराज माथनकर हा एकनाथ शिंदे यांच्या पाया पडताना दिसत आहे.

दरम्यान, युवराज माथनकर यांच्या अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. या गुन्ह्यांमध्ये युवराज माथनकर काही दिवस तुरुंगातही राहिला आहे. त्याच्या टोळीवर मकोका सुद्धा लागला होता. त्याची काही गुन्ह्यात निर्दोष मुक्तता झाली होती. नागपूरमध्ये युवराज माथनकरचा दबदबा आहे.

याला आजही लोकं गुंड म्हणून ओळखतात. अशा नेत्याला पक्षात घेऊन आता एकनाथ शिंदे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अशा व्यक्तीच्या हाती शिंदेंनी धनुष्यबाण दिल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

माथनकर सोबतच काँग्रेस तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटातील अनेक कार्यकर्त्यांनी शिंदेच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला आहे. यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे. विरोधक याबाबत आवाज उठवत आहेत. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!