सणसरमध्ये जय हनुमान गणेश तरुण मंडळाकडून दरवर्षीप्रमाणे संत तुकाराम महाराजांच्या वारीतील वारकऱ्यांना पाण्यासह बिस्कीट वाटप…

सणसर : संत तुकाराम महाराज पालखी सोहळा काल इंदापूर तालुक्यातील संसार या गावांमध्ये मुक्कामी होता यावेळी गावकऱ्यांनी पालखीचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले तसेच वारकऱ्यांसाठी अनेक सेवा तसेच अन्नदान देखील केले
यामध्ये जय हनुमान गणेश तरुण मंडळाने दरवर्षीप्रमाणे श्री संत सद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळानिमित्त 3000 पाणी बॉटल 5000 बिस्किट वाटप करण्यात आले. मंडळाकडून यावर्षी देखील वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी ही सेवा केली. तसेच सर्व सदस्यांनी पालखीवर जेसीबीमधून फुलांचा वर्षाव केला.
मंडळाचे कार्यकर्ते वेगवेगळे सांस्कृतिक सण परंपरा जपत दरवर्षी असे समाजउपयोगी उपक्रम राबवत असतात. यावर्षी देखील सकाळपासूनच उपस्थित सर्व सदस्यांनी वारकऱ्यांची सेवा केली. यावेळी मंडळाचे सर्व सदस्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Views:
[jp_post_view]