मी आता कंटाळलो आहे, १० दिवसात मी स्वत:ला संपवेन, खोट्या अफवेमुळे संतापला छोटा पुढारी, नक्की काय घडलं?


पुणे : ‘बिग बॉस मराठी 5′ आणि ‘शिट्टी वाजली रे’ फेम ‘ छोटा पुढारी ‘ म्हणजेच घन:श्याम दरोडे सोशल मीडियावर विशेष सक्रिय आहे. घनश्याम दरवडे हा सोशल मीडियावरील सततच्या ट्रोलिंगमुळे व्यथित झाला आहे.

आपल्या उंचीवरून होणाऱ्या त्रासाला आणि आई-वडिलांना दिल्या जाणाऱ्या त्रासाला कंटाळून, त्याने ट्रोलर्सविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली असून, १० दिवसांत कारवाई न झाल्यास आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे.

घनश्याम दरवडे याने नुकतीच श्रीगोंदा पोलीस ठाण्यात काही सोशल मीडिया युजर्सविरोधात रीतसर तक्रार दाखल केली आहे. आपल्या तक्रारीत त्याने म्हटले आहे की, काही टवाळखोर लोक सतत सोशल मीडियावर त्याच्या उंचीवरून त्याला चिडवतात आणि अपमानास्पद टिप्पणी करतात, ज्यामुळे त्याला मानसिक त्रास होत आहे.

या ट्रोलर्सनी आता हद्द ओलांडली असून, ते आपल्या आई-वडिलांनाही लक्ष्य करत आहेत, असे घनश्यामने म्हटले आहे. मला जिवंतपणी मारलं जातंय, अशा शब्दांत त्याने आपली वेदना व्यक्त केली आहे. या तक्रारीद्वारे त्याने अशा लोकांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, पोलिसांत तक्रार दाखल करण्यासोबतच घनश्यामने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत एक सूचक इशारा दिला आहे. जर पुढील १० दिवसांत या ट्रोलर्सवर कोणतीही कारवाई झाली नाही, तर आपण आत्महत्या करू, असे त्याने म्हटले आहे. त्याच्या या इशाऱ्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!