माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत एकाच शिलेदाराची चर्चा! 35 वेळा पडला पण हिंमत सोडली नाही, शिवाजी कोकरे नेमके आहेत कोण?


बारामती : येथील माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीची सध्या मतमोजणी सुरू आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या कारखान्याच्या निवडणुकीच्या रिंगणात शिवाजी कोकरे हे उमेदवार म्हणून उभे राहिले होते. शिवाजी कोकरे यांनी आतापर्यंत 35 वेळा निवडणूक लढवली आहे. त्यांचा एकदाही विजय झाला नाही.

असे असले तरी ते हिंमत न हरता निवडणुकीला उभे राहत आले. उभे राहून ते लोकशाही मार्गाने निवडणूक लढवत असतात. माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आली की, शिवाजी कोकरे यांचे नाव हमखास चर्चेत असते. अनेकदा त्यांनी चांगली मते देखील घेतली आहेत.

लोकशाही जिवंत राहिली पाहिजे. आतापर्यंत 1992 पासून जेवढ्या निवडणुका झाल्या त्या बिनविरोध नाही झाली पाहिजे, हीच शिवाजी कोकरे यांची भूमिका आहे. आपण आपल्या पद्धतीने लोकशाही मार्गाने निवडणुकीला सामोरे जायचे असे त्यांचे म्हणणे आहे. लोकांना ते याचे महत्व सांगतात.

ते म्हणतात, सत्तेपुढे पुढे माझा टिकाव लागणार नाही मला माहिती आहे. मात्र तरी देखील शिवाजी कोकरे निवडणूक लढवत आहेत. शिवाजी कोकरे यांनी आतापर्यंत 35 निवडणुका लढवली आहे. त्यांनी लोकसभा पासून विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि कारखाना अशा निवडणुका लढवल्या आहेत.

यामुळे तालुक्यातील निवडणूक आली की त्यांचे नाव नेहेमी चर्चेत येते. आगामी काळात देखील आपण सगळ्या निवडणूका लढवणार, असेही त्यांनी सांगितले आहे. आता माळेगावच्या निवडणुकीच्या निमित्ताने ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!