तुकोबारायांच्या वारीत लावणी कलावंतांकडून लावण्या व अभंगांने वारकरी मंत्रमुग्ध!! रंगली टाळ अन् चाळची जुगलबंदी..


यवत : संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा यवतचा मुक्काम उरकून वरवंड मुक्कामी मार्गस्थ होण्यासाठी पंढरीच्या वाटेवर आहे. या पालखी मार्गात महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या केडगाव चौफुला येथील न्यू अंबिका कला केंद्रात महिला कलाकारांकडून वारकऱ्यांची सेवा करण्यात आली. या कलाकारांनी टाळ व चाळ यांचा मिलाप घडवून अभंग व लावणी यांचा मिलाप साधून वारकऱ्यांना मंत्रमुग्ध केले.

चौफुला येथील न्यू अंबिका कला केंद्राकडून दरवर्षी आषाढी वारीसाठी पंढरीकडे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी अन्नदान व कलेचा आनंद लुटण्यासाठी सेवा पुरविली जात आहे. पायी चालून थकलेल्या वारकऱ्यांना विरंगुळा म्हणून लावणी कलाकार सेवा देत असतात. यंदाच्या वर्षीही या कला केंद्रात पांडुरंगाला नमन करुन लावण्यवतींनी कलेची सेवा उपलब्ध करुन दिली होती.

या सेवेत वारकऱ्यांनी सहभाग घेत कलेचा आनंद घेतला. अंबिका कला केंद्राचे संचालक डॉ. अशोक जाधव व जयश्री जाधव यांच्या कडून 10 हजार वारकऱ्यांना जेवणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. स्वतः हा लावणी कलाकारांनी वारकऱ्यांना अन्नसेवादान करुन सेवेचे भाग्य मिळाल्याचे समाधान व्यक्त केले आहे.

लावणी कलावंत पंढरपूरला जाता आलं नाही तरी वारकर्यांच्या मध्येच ते विठ्ठलाला शोधत आहे.
-डॉ अशोक जाधव (संचालक न्यू अंबिका कला केंद्र )

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!