वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांकडून धक्कादायक खुलासा, पती शशांकने ८ दिवस…


पुणे : पुण्यातील वैष्णवी हगवणेच्या मृत्यूच्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडवली आहे. हुंड्यासाठी छळ झाल्याचा आरोप करत पोलिसांनी तिच्या सासरच्या पाच नातलगांना अटक केली आहे. याबाबत तपास सुरू असताना अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत.

आता या प्रकरणात पोलिसांनी एक धक्कादायक खुलासा करत संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली आहे. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, वैष्णवीने जीवन संपवण्यापूर्वी तिला सलग आठ दिवस वेगवेगळ्या हत्यारांनी मारहाण करण्यात आली होती.

तिच्या शरीरावर जखमांचे स्पष्ट चिन्हे पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये नमूद आहेत. तिचा पती शशांक हगवणे यानेच तिच्यावर शारीरिक अत्याचार केला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. या मारहाणीतील वापरलेली हत्यारेही पोलिसांनी जप्त केली आहेत.

दरम्यान, या प्रकरणाच्या तपासादरम्यान हगवणे कुटुंबातील सर्व सदस्यांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. तसेच त्यांच्या नावे असलेले पिस्तुल परवाने रद्द करण्याची शिफारस पोलिसांनी केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!