मोठी बातमी! कोरोनामुळे ठाण्यात तरुणाचा बळी, मुंबईत अनेक रुग्ण, शहरात भीतीचे वातावरण…

ठाणे : ठाणे महापालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मुंबईसह ठाण्यात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्याचे चित्र आहे. यामुळे पुन्हा एकदा जुनी परिस्थिती उद्धभली आहे.
या २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. ठाणे शहर पुन्हा एकदा कोरोनाच्या सावटाखाली आले आहे. तसेच कळवा रुग्णालयातील कोविड कक्षात आणखी एक गर्भवती महिला कोरोनाचा उपचार घेत आहे. तिच्या अंगातील ताप आता कमी झाला असून तिच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली आहेत. तिची प्रकृती आता स्थिर आहे.
दरम्यान, मुंबईत ३५ रुग्ण आढळले आहेत. मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या ही १८५ वर पोहोचली आहे. तर रुग्णसंख्येत आणखी भर पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांची धाकधूक वाढणार आहे. यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. याबाबत प्रशासन जर संख्या वाढली तर महत्वाचे निर्णय घेईल.
मे महिन्यापासून मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. मुंबईत सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. २३ मे ला राज्यात ४५ कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे आगामी काळात काळजी घ्यावी लागणार आहे. याबाबत प्रशासन सतर्क झाले आहे. महापालिका याकडे लक्ष ददेऊन आहे.