संबंध ठेवले नंतर आर्थिक वाद, पिंपरीतील 18 वर्षीय तरुणीचा शेजाऱ्यानेच केला खून, मामा-भाच्याला अटक

पिंपरी चिंचवड : येथील एका तरुणीचा धारधार शस्त्रने वार करून खून केल्याची घटना समोर आली होती. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोघांमध्ये असलेल्या संबंध आणि आर्थिक व्यवहारातून ही हत्या शेजाऱ्यानेच केल्याचे उघड झाले आहे. याबाबत तपास सुरु आहे. कोमल भरत जाधव असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.
या प्रकरणी पोलिसांनी उदयभान यादव (वय 45) आणि त्याचा सख्खा भाचा यांना अटक केली आहे. अवघ्या काही तासांतच पोलिसांनी ही कारवाई केली आहे. खून झालेली तरुणी कोमल जाधव ही पिंपरी चिंचवड परिसरात असलेल्या वाल्हेकरवाडीत कुटुंबासोबत राहत होती. कृष्णामाई परिसरात तिचे घर आहे. यादव हा तिच्याच शेजारी रहायला होता.
त्या दोघांमध्ये आर्थिक व्यवहारातून वाद झाले होते. त्यामुळे उदयाभान याने कोमल हिला मारण्याचा निर्णय घेतला होता. त्याने आपल्या भाच्याच्या मदतीने रात्री डोक्यात हेल्मेट घालून कोमलला घराच्याबबाहेर बोलावून घेतले. जशी कोमल घराच्या खाली आली तसा तिच्यावर शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात कोमलचा मृत्यू झाला.
कोमल जाधव आणि आरोपी हे शेजारी राहत होते. त्या दोघांमध्ये संबंध होते. तसेच त्यांच्यात आर्थिक व्यवहारही झाले होते. त्यातूनच दोघांमध्ये वाद झाले. त्यानंतर आरोपीने भाच्याच्या मदतीने हत्या केल्याचे समोर आले आहे. अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घाटना स्थळी धाव घेत तपास सुरु केला.
पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपींना बेड्या ठोकल्या. भररस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे वाल्हेकरवाडी परिसरात भीतीचे वातावरण पसरले. रात्रीच्या वेळी भर चौकात अशा प्रकारे तरुणीची हत्या झाल्याने चर्चा सुरु झाली आहे. या घटनेने शहरातील कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न देखील उपस्थित झाले.