शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! केरळमध्ये २७ मेपर्यंत मान्सूनचे आगमन! महाराष्ट्रात कधी बरसणार? महत्वाची माहिती आली समोर..


पुणे : यंदाच्या वर्षी उष्णतेने अनेक रेकॉर्ड तोडले. भयंकर उन्हाळा यावर्षी अनुभवायला मिळाला. असे असताना आता पावसाळा कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता अंदमानच्या समुद्रात यंदा लवकर दाखल होणारा मान्सून पुढचाही प्रवास लवकर करत भारताच्या भूमीवरही लवकर दाखल होण्याची शक्यता आहे.

२७ मे रोजी मान्सून केरळमध्ये पोहोचू शकतो. १३ मेपर्यंत दक्षिण अंदमानचा समुद्र, बंगालच्या उपसागराचा आग्नेय भाग आणि निकोबार बेटांपर्यंत मान्सून पोहोचण्याचे पूर्वानुमानही शनिवारी वर्तवण्यात आले. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रासंदर्भातील अंदाज वर्तवण्यात येईल. मुंबईत १० जूनला व सह्याद्री ओलांडून महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात १५ जूनला मान्सून अपेक्षित आहे.

यामध्ये पश्चिम किनारपट्टी समांतर मुंबईकडे येणाऱ्या मान्सूनच्या प्रवाहात बळकपणा किती आहे, हे पाहूनच महाराष्ट्रात मान्सून जूनच्या कोणत्या तारखेला प्रवेश करील, हे सांगता येईल. केरळमध्ये दाखल होण्याचा सर्वसाधारण दिवस १ जून आहे. मात्र यंदा मान्सूनचा अंदमानच्या समुद्रापर्यंतचा प्रवासही आधी सुरू झाला आहे.

दरम्यान, यंदाचा २७ मेचा अंदाज हा या तारखेच्या पुढे-मागे चार दिवस या कालावधीमध्ये मान्सून आगमनाचा समजला जाईल. म्हणजे २३ ते ३१ मे या कालावधीत यंदा मान्सूनचे आगमन अपेक्षित आहे. मान्सूनचा पुढचा प्रवासही सुरळीत पार पडण्याची शक्यता आहे. केरळमधून देशात मान्सून दाखल होण्याच्या आधी वातावरणात बदल नोंदवला जातो.

सध्या याचाच परिणाम म्हणजे अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. सध्या कोरड्या आणि उष्ण वातावरणानंतर पावसाळी वातावरण जाणवू लागते. १ जूनला मान्सून दाखल होईल, असा अंदाज वर्तवताना यामध्ये मान्सून आगमनाच्या तारखेच्या पुढे- मागे सात दिवसांचा कालावधी गृहीत धरला जातो. गेल्या पाच वर्षांमध्ये दोनवेळा मान्सून १ जूनच्या आधी दाखल झाला होता.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!