शिरूरमध्ये राजकीय घडामोडींना वेग! मंगलदास बांदल यांनी घेतली पार्थ पवारांची भेट…!

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळातून चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांच्यावर यापूर्वी काही गुन्हे दाखल झाले असल्याने त्यांना पक्षातून काढण्यात आले होते. मात्र बांदल हे वीस महिन्यांहून अधिक काळ कारागृहात राहिले असता ते नुकतेच बाहेर आले आहेत.
सध्या बांदल यांनी अद्याप कोणत्या पक्षात प्रवेश केला नसून पक्षाबाबत कोणतीही भूमिका त्यांनी जाहीर केलेली नाही. बांदल शिरुर तालुक्यातील राजकारणात नेहमी आमदार अशोक पवार यांच्या विरोधात राहिलेले आहे.
यामुळे आता कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांनी पार्थ पवार यांची भेट घेत दोघांमध्ये तब्बल 1 तास चर्चा झाल्याने खळबळ उडाली असून बांदल यांच्या डोक्यात चालले तरी काय, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
दरम्यान, आमच्यात शिरुर लोकसभा मतदार संघाबाबत राजकीय चर्चा झालेली असल्याचे मंगलदास बांदल यांनी सांगितले. मंगलदास बांदल यांनी नुकतेच पुणे जिल्ह्यातील जिजामाता सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी स्वतः सह पत्नी रेखा बांदल व भावाच्या नावाने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.