शासनाच्या महत्वकांक्षी ॲग्रीस्टॅक योजनेत वारसनोंदीला सातबारा संगणीकरण नसल्याचा ब्रेक ! संकेतस्थळावर वारसनोंद अद्यावत नसल्याने फॉर्मर आयडी नोंद रखडली ….


जयदिप जाधव                                                 उरुळीकांचन : शासनाने शासकीय कामांसाठी तसेच शेतकरी ओळख पुरावा ‘ॲग्रीस्टॅक’ योजनेतून शेतकऱ्यांना स्मार्ट कार्ड ओळखपत्र देण्याची योजना आखली आहे. त्यानुसार ॲग्रीस्टॅक योजनेनुसार कार्डसाठी फॉर्मर आयडीसाठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यात शेतकऱ्यांनी या नोंदणीसाठी मोठा प्रतिसाद दिला आहे. या योजनेतून फार्मर आयडी बनविण्यासाठी एक टप्पा पूर्ण झाला असला तरी या योजनेतून ॲग्रीस्टॅक कार्ड तयार करण्यासाठी ॲग्रीस्टॅकच्या संकेतस्थळावर अद्ययावत यादी नसल्याने नवीन वारस नोंद खातेदार शेतकरी या नोंदणीपासून वंचित राहत असून संकेतस्थळावर या ऑनलाइन सातबारा नोंद होऊन नाव नसल्याने वारसनोंद खातेदार शेतकऱ्यांची नोंद या
अभियानात रखडली आहे.

शासनाने शेतकरी ओळख म्हणून तसेच शासकीय
कामांसाठी तसेच शासकीय योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचावी म्हणून ॲग्रीस्टॅक योजनेतून ‘ॲग्रीस्टॅक’ ओळखपत्र तयार करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या योजनेतून सुरुवातीला शेतकऱ्यांची फॉर्मर नोंदणी होऊन त्यानंतर परिचयपत्रक म्हणून ओळखपत्र कार्ड देण्यात येणार आहे. त्यासाठी कृषी व महसूल विभागांकडून शेतकऱ्यांचे मेळावे घेऊन ॲग्रीस्टॅक योजनेचा लाभ घेण्यासाठी जनजागृती करण्यात आली आहे.

या योजनेच्या नोंदणीसाठी ॲग्रीस्टॅकच्या संकेतस्थळावर राज्यातील शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार महा- ईसेवा व सीएससी केंद्रावर शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅकचा आयडीची नोंदणी करता येणार आहे. या नोंदणीला शेतकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. मात्र ॲग्रीस्टॅक यादी अद्ययावत न झाल्याने मयत खातेदार शेतकऱ्यांच्या जागी महसूल रेकॉर्डमध्ये ऑनलाईन वारसनोंद होऊनही ॲग्रीस्टॅकची यादी अद्ययावत नसल्याने नवीन वारसांची नोंदणी ठप्प आहे.

शासनाने ॲग्रीस्टॅक कार्ड विकसित करताना आधारकार्ड, मोबाईल क्रमांक , बँक बचत खाते , ॲग्रीस्टॅक कार्ड लिंक असणार आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना शासकीय योजनांची माहिती, शासकीय लाभ, नुकसान ग्रस्तांना मदत तसेच अनुदान थेट डीबीटीद्वारे शेतकऱ्यांना देताना मदत होणार आहे. त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांची या कार्डने ओळख निर्माण होऊन शासकीय कामकाजात बंधनकारक करण्यात येणार आहे.

परंतु फॉर्मर आयडी नोंदणीकरताना संकेतस्थळावर नावे सामाविष्ठ नसल्याने ऑनलाईन यादी अद्यावत करण्याची गरज निर्माण झाली आहे. परंतु या योजनेच्या नोंदणीला सुरुवात होऊन काही काळ उलटून गेल्यानंतर संकेतस्थळावर यादी अद्यावत नसल्याने वारस नोंद झालेल्या खातेदारांची नोंद रखडली आहे.

दरम्यान शासनाने सातबारा संगणीकरण तसेच देखभाल व दुरुस्तीचे काम शासनाने एनआयसीकडे दिले आहे. अशावेळी महसूल अभिलेखात वासरनोंद होऊनही ॲग्रीस्टॅकच्या संकेतस्थळावरील यादीत नावे अद्ययावत नसल्याने वारसांची नोंद ॲग्रीस्टॅकच्या प्रलंबित राहत आहे.

 

ॲग्रीस्टॅकच्या फॉर्मर आयडी नोंदणीसाठी तलाठी
व कृषी विभाग स्तरावर शेतकऱ्यांचे प्रलंबित सातबारा ऑनलाइन स्वरूपात करण्याचे आदेश दिले आहेत. वारस नोंदणीही तात्काळ करण्याची सूचना आहे. या योजनेसोबत शासन नव्याने ‘जिवंत सातबारा’ ही संकल्पना तालुका तालुक्यात राबविणार आहे. या संकल्पनेचा फायदा सातबारा संगणीकरण होण्यात होणार आहे. खातेदारांची वारसनोंद करण्यासही मदत होणार आहे. तरीही काही त्रुटी असतील तर ‘एनआयसी’ मार्फत सातबारा अद्यावत करण्याची सूचना देण्यात येईल”                                                                   

– सरीता नरके, राज्य समन्वयक सातबारा संगणीकरण

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!