अखेर ठरलं! लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज तुमच्या खात्यात…

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

फेब्रुवारी महीना संपत आला तरी पैसे न आल्याने अखेर पैसे कधी मिळणार असा सवाल महिला विचारत आहे. मात्र आता यासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या महिन्याचे १५०० रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात आज जमा होण्याची शक्यता आहे.
नव्या निकषानुसार, लाडक्या बहिणींच्या खात्यत हे पैसे जमा होऊ शकतात. काही तांत्रिक कारणांमुळे आत्तापर्यंत हे पैसे जमा झाले नव्हते. मात्र आता, आज हे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतात अशी माहिती समोर आली आहे

मिळालेल्या माहितीनुसार, नव्या निकषांनुसार, हे पैसे जमा होतील. सुरुवातीला सरसकट महिलांसाठी असणारी ही योजना आता निकषाच्या जाळ्यात अडकत आहे. लाडकी बहीण योजनेची जुलै महिन्यात घोषणा झाल्यानंतर सर्वच लाडक्या बहिणी होत्या. त्यांना दर महिन्याला १५०० रुपये देण्यात येत होते.

मात्र गेल्या काही महिन्यांपासून या योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जांची पडताळणी केली जात असून निकषांत न बसणाऱ्या महिलांन वगळून फक्त गरजू बहिणींनाच योजनेचा लाभ देण्याचे प्रकार समोर येत आहे. या पडताळणीनंतर आत्तापर्यंत एकूण 9 लाख बहिणी बाद झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वित्त विभागाकडून ३ कोटी ४९० कोटी वर्ग करण्यात आले आहेत.