लग्न जमत नसल्याने 30 वर्षीय तरुणाने केली आत्महत्या, कुटुंबाचा एकच आक्रोश, घटनेने उडाली खळबळ…


हिंगोली : राज्यात सध्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाची समस्या गंभीर बनली आहे. शेतीची दुरवस्था झाल्याने शेतकरी कुटुंबांत किती गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत याचे भयावह वास्तव अनेकदा सर्वेक्षणातून पुढे आले आहे. यामुळे येणाऱ्या काळात यावर काहीतरी उपाय करणे गरजेचे बनले आहे. अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न रखडलेली आहेत.

वयाची तिशी गाठल्यानंतर देखील केवळ मुली मिळेना म्हणून युवकांची लग्न होत नाहीत. असे असताना हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील एका 30 वर्षीय युवकाने लग्न जमत नसल्याने आत्महत्या केली. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे परिस्थिती किती भयावह आहे, हे दिसून येत आहे.

सध्याच्या काळात लग्नासाठी मुलींच्या अपेक्षा, मुलींच्या पालकांच्या अपेक्षा आणि पुरुष व महिला यांच्यातील जन्मदरात असलेली असमानता यासाठी कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे, आधीच नोकरी नाही, त्यात लग्नासाठी पोरगी पण मिळत नसल्याने तरुणाई निराशेच्या छायेत गेली आहे. हिंगोलीच्या कळमनुरी शहरातील धक्कादायक घटना समोर आली आहे.

लग्न जमत नसल्याने चक्क युवकाने आपलं जीवन संपवल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गजानन व्यवहारे असे मृत झालेल्या 30 वर्षीय तरुणाचे नाव आहे. या तरुणाचे लग्न जमत नसल्याने त्याने स्वतःच्या शेतामध्ये झाडाला दोरीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. यामुळे कुटूंबाला एकच धक्का बसला आहे.

या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून मुलांच्या लग्नाची समस्या अधिक गंभीर असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. यामुळे येणाऱ्या काळात तरी ही परिस्थिती बदलणार की अजूनच भयंकर होणार हे लवकच समजेल. मात्र सध्या तरी काहीही करून मुलांचे लग्न करण्यासाठी पालकांची धडपड सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!