मोठी बातमी!! अखेर सगे- सोयऱ्यांची अंमलबजावणी ‘या’ तारखेपासून होणार, मराठा समाजासाठी मोठी बातमी आली समोर…


बीड : गेल्या अनेक दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत. याबाबत आता नुकताच जरांगे यांनी मोठा दावा केला आहे. सगे- सोयऱ्यांचा निर्णय कधीपर्यंत होणार हे थेट त्यांनी सांगितले. त्यांनी तारीखही सांगून टाकली आहे. यामुळे याकडे संपूर्ण समाजाचे लक्ष लागले आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, 25 फेब्रुवारी येत्या मंगळवारपर्यंत देवेंद्र फडणवीस हे सगे- सोयऱ्यांचा निर्णय घेतील. सात करोड मराठा डोळे लावून बसले आहेत. शिंदे समिती त्यांनी सुरू केली. येत्या मंगळवारच्या कॅबिनेटमध्ये निर्णय मंजूर शंभर टक्के होणार. आम्ही त्यांच्या स्वागतासाठी तयार असल्याचे जरांगे म्हणाले.

यामुळे आता मंगळवार पर्यंत सर्वांचे लक्ष लागले आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची मनोज जरांगे पाटील यांनी भेट घेतली. देशमुखांच्या हत्येनंतर जरांगे पाटील हे अनेकदा मस्साजोगला जाताना दिसले. यावेळी त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली.

मुंडे हे पदाला चिटकून बसलेला आहे. लालची माणसांना जनतेचे देणे घेणे नाही किंवा जातीचेही नाही. जनतेने तुम्हाला तिथे बसवले आहे आणि जनता तुमचा राजीनामा मागत असेल तर तुम्ही राजीनामा द्यायला पाहिजे. त्यांना फक्त पैसा आणि पद लागते, असे म्हणत त्यांनी जोरदार टीका केली आहे.

तसेच ते म्हणाले, लोकांना वेड्यात काढले तर न्याय नाही. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी बीडच्या पोलिसांवर काही गंभीर आरोप केले आहेत. काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी देखील संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यामुळे वातावरण तापले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!