ब्रेकिंग! रावसाहेब दानवे यांचे जावई माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना अटक, नेमकं घडलं काय?


छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाच्या निर्देशानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले असून सरकारी कामात अडथळा आणण्याच्या प्रकरणात हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध अनेक वॉरंट निघूनही ते न्यायालयात हजर झाले नव्हते.

हर्षवर्धन जाधव काल नागपूर न्यायालयात उपस्थित झाल्यावर पोलिसांनी न्यायालयाच्या निर्देशावरुन त्यांना ताब्यात घेतले आहे. सध्या त्यांना नागपूरच्या मेयो या सरकारी रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आले आहे. हर्षवर्धन पाटील हे कन्नड विधानसभेचे माजी आमदार आहेत.

अनेकदा ते वादात सापडले आहेत. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. हर्षवर्धन जाधव हे त्यांची पत्नी संजना जाधव यांच्याकडूनच पराभूत झाले होते.

दरम्यान, त्यांना न्यायालयाने तुरुंगात नेण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे पोलिसांकडून कायदेशीर प्रक्रिया पार करत त्यांना रीतसर अटक करुन तुरुंगात पाठवण्याची दाट शक्यता आहे.उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी जात असताना त्यांनी वाद घालत होता. यासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच 2011 मध्ये पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली होती.

यामध्ये त्यांना जिल्हा न्यायालयाने एका वर्षाची सक्तमजुरी व 10 हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली होती. नंतर त्यांना जामीन मंजूर झाला होता. कौटुंबिक वादामुळे तसेच इतर कारणांनी ते सतत चर्चेत असतात. सध्या हर्षवर्धन जाधव यांच्या छातीत वेदना होत असल्याने त्यांना पुढील 24 तास पोलिसांकडून अंडर ऑब्झर्वेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!