कमी क्षेत्रात जास्तीचे उत्पादन! टिळेकरवाडी येथील शेतकरी संतोष राऊत यांची ऊस लागवडीत किमया…

उरुळी कांचन : टिळेकरवाडी (ता. हवेली ) येथील शेतकरी संतोष राऊत यांनी कमी क्षेत्रात जास्तीचे उत्पादन घेतल्याने त्याचीच सध्या चर्चा टिळेकरवाडीत सुरु आहे. तसेच ऊस लागवड करून त्यांनी ही किमया साधली आहे. त्यांनी अर्धा एकर क्षेत्रात चाळीस टन उस काढला आहे. या उसाला ३२ कांडे असून तो मोठ्या प्रमाणावर वाढला होता.

त्यांनी श्री ॲगो एजन्सी उरुळी कांचन येथील कदम यांच्या दुकानातून तसेच त्यांच्या मार्गदर्शनातून आवश्यक ख़ते, औषधे घेतली. सध्या उसाचे उत्पादन घटत असून शेतकरी इतर पर्याय निवडत आहेत. तसेच सतत एकच पीक घेतल्याने शेतीचा कस देखील निघून चालला आहे.
दरम्यान, असे असले तरी काही शेतकरी मात्र उसाचे पीक घेऊन चांगल्या प्रकारे उसाचे पीक घेत आहेत. संतोष राऊत यांनी देखील योग्य नियोजन करून उसाचे चांगले उत्पादन घेतले आहे. यामुळे त्यांना यातून चांगले आर्थिक उत्पादन मिळणार आहे.

दरम्यान, पिकांची गरज ओळखून शेतकऱ्यांनी खते-औषधांची योग्य मात्रा देणे गरजेचे आहे. जमिनीची मशागत व पिकाची देखभाल शेतकऱ्यांना हमखास उत्पन्न मिळवून देते. योग्य वेळी केलेली मशागतीची कामे आणि तणनाशकांची फवारणी करून उस पिकाचे संगोपन केल्यास निश्चितपणे व खात्रीशीर उत्पादन मिळवता येऊ शकते.
