नागपूरमधील फिल्मसिटीची जागा अखेर ठरली!! आशिष शेलार यांनी केली मोठी घोषणा…


नागपूर : राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी एक मोठी घोषणा केली आहे. नागपुरातील फिल्मसिटीच्या संदर्भात या ठिकाणी अनेक विभागांची संयुक्त बैठक होऊन रामटेकजवळ १२८ एकर जागा फिल्मसिटीसाठी निश्चित करण्यात आली आहे. यामुळे याठिकाणी लवकरच काम सुरू होणार आहे.

विदर्भात चित्रपटनिर्मितीला चालना मिळावी यासाठी चित्रपट नगरी निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. ही जागा हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव आगामी पंधरा दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाईल, असेही मंत्री यावेळी म्हणाले. याबाबत इतर देखील कामे केली जाणार आहेत.

यावेळी मंत्री आशिष शेलार म्हणाले, नागपूर जिल्ह्यातील फिल्मसिटी यशस्वी व्हावी, यासाठी एक कन्सल्टंट नेमण्याचा निर्णय झाला आहे. दरम्यान, आरबीआयने नियम आणि कायद्याच्या चौकटीत कारवाई केली आहे. या दृष्टीने लोकांचे पैसे सुरक्षित राहावेत, यासाठीच ही कारवाई केली आहे.

केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री यावर चर्चा करून सर्व ठेवीदारांचे पैसे सुरक्षित राहतील. लोकांना पैसे परत मिळतील याची काळजी घेतील, अशी माहितीही सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी यावेळी दिली आहे. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!