मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मिशन लव्ह जिहाद!! आता महाराष्ट्रातही कायदा करणार, जीआरही निघाला…

मुंबई : राज्यात लव्ह जिहाद विरोधातील कायदा करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. याबाबत सतत मागणी केली जात आहे. त्यानुसार पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे, असा शासन निर्णय राज्य सरकारने जारी केला आहे.

यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामुळे लवकरच राज्यात लव्ह जिहाद विरोधात कायदा लागू होऊ शकतो. या प्रकरणांमध्ये कारवाई करण्यासाठी शुक्रवारी जी समिती स्थापन केली आहे, तिचे नेतृत्व राज्याचे पोलीस महासंचालक करणार आहेत. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले आहेत.
या समितीमध्ये 7 सदस्य असतील. सरकारच्या महिला व बालविकास, अल्पसंख्यांक विकास, विधी व न्याय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा प्रत्येकी एक सदस्य आणि गृह विभागाचे दोन सदस्य समितीवर घेण्यात आले आहेत. त्यांच्या अभ्यास सुरू होणार आहे. यामुळे याबाबत सरकार विधारधीन आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी लव्ह जिहाद आणि व्होट जिहाद याबाबत वक्तव्य केले होते. बळजबरीने होणारे धर्मांतर, विशेष करून आंतरधर्मीय लग्नाच्या माध्यमातून होणारे धर्मांतर (लव्ह जिहाद) रोखण्यासाठी लवकरच कायदा करू, असे अशी घोषणा त्यांनी केली होती.
त्यानुसार आता प्रयत्न केले जात आहेत. सरकारने जारी केलेल्या शासन निर्णयात म्हटले आहे की, राज्यातील विविध संघटना व काही नागरिकांनी लव्ह जिहाद व फसवणूक करून किंवा बळजबरीने केलेले धर्मांतरण रोखण्यासाठी कायदा करण्याबाबत निवदेने सादर केली होती. त्यानुसार अभ्यास सुरू करण्यात आला आहे.
भारतातील काही राज्यात लव्ह जिहादविरोधात कायदा करण्यात आला आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रात लव्ह जिहादच्या विरोधातील कायदा करण्यासाठी पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. यामुळे येणाऱ्या काळात समिती जो निर्णय घेईल त्यानुसार काम होणार आहे.